चालढकल' हा ज्यांच्या आयुष्याचा भाग आहे, त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काय माहित्ये हे सांगण्यापासून जर सुरवात केली तर अखंड पाने भरली जातील.
आपल्याला हे खूप उत्तम रीतीने माहित्ये कि - 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे'. पाचशे वर्षांपूर्वी समर्थानी सांगितलेलं हे वाक्य, काळाच्या सर्व परीक्षा पार करून आज देखील मार्गदर्शन करतंय. इतिहास बाजूला ठेऊन जरी आज अवतीभाती पहिल, तर आपल्याला भांडवलशाहीच उत्तमोत्तम उदाहरण असलेल 'नाईकी' सर्व ठिकाणी नक्की बघायला मिळेल. पूर्व असो किंवा पश्चीम. "Nike - Just Do It". अब्जाचा व्यापार या वाक्यामुळे होतो आणि होत राहील. थोडक्यात म्हणजे अनेक निबंधांचे जे प्रमूख कार्य असतं 'proving the point' ते कार्य पूर्ण. केवळ उच्चारातून अर्थापर्यंतचा विचाराचा प्रवास लगेच पूर्ण होतो कारण हे खरं आहे.
मी जरा खोलात जाऊन लिहिणार आहे.
केल्याने काय होत आहे?
रे म्हणजे मीच का?
आधी म्हणजे नक्की कधी?
केलेची म्हणजे 'must / should / could'?
पाहिजे कोणाला?
केल्याने काय होत आहे?
ज्योती ना., माझी खूप हुशार आणि व्यवहारी मैत्रीण. तिने मला एकदा खूप उत्तम सल्ला दिला "शुचिता, जो काही निर्णय आपण घेतो, तो एकदा तरी खूप छान result देतो, आणि किमान एकदा तरी खूप भयंकर result. निर्णय ना घेणं हा देखील एक निर्णय-च आहे" त्या नंतर आम्हाला कळलं कि भयंकर म्हणजे खूप वाईट नाहि, आणि छान म्हणजे देखील खूप छान नाही. टोकाचं असं आयुष्यात काही generally नसतं. आज मला असं वाटतंय कि "केल्याने काय होत आहे?" यातिल पहिला अडथळा विचारांत आहे. 'paralysis by analysis' हे आपल्या सगळ्यानी अनुभवलय. एखादी गोष्ट करावी असा विचार आल्यानंतर ते कशी नंतर करावी हा विचार लगेच येतो. मग आपण सवय बदलू शकतो का? नक्की. कोविड काळात मला हे कळतंय कि सवयी बदलायच्या असतील तर त्या नवीन सवयीनं replace करायला हवं म्हणजे हवं. नाही तर जुनी सवय डोकावते. 'चालढकल' का बरं आपल्याला वर्ज्य नाही करता येणार? try करायला काय हरकत आहे?
रे म्हणजे मीच का?
रे म्हंजे मीच. कारण स्वत: न करता, दुसऱ्याला सल्ला देणं योग्य नाही.
आधी म्हणजे नक्की कधी?
"The 5 Second Rule" by Mel Robbins. मी TED _Talk मध्ये ऐकून होते कि जर आपण ५ क्षणात कार्यरत झालो नाही तर आपला मेंदू टी गोष्ट रद्द करतो. जे गोष्ट आपल्याला करायची असते, त्याचा विचार येत राहतो. कार्यरत ना झाल्या मुले विचार मरत राहतो. मग खूप काळ टी गोष्ट केली नाही तर stress कारण मेंदूला माहित्ये कि करायला तर हवंय. जर मी म्हंटलं कि आपण जेवढा वेळ विचार करतो तेवढा वेळ कृती करण्यात घालवला तर खूप गोष्टी घडून येतील - तर तुम्ही सहमत असाल का? एक अजून भाग बघूया - लगेच गोष्टी करणं म्हणजे धांदरट असणं किंवा उथळ असणं आहे का? कदाचित असू शकेलं. पण आपण हुशार आहोत. पहिल्यांदा घाई घाई मध्ये 'आधी' या शब्द कदाचित आपलयाला त्रास देईल देखील. पण, अनुभवातून आपण नक्की बॅलन्स सांभाळायला शिकू. आधी केल्या मुले होणारा त्रास नक्कीच फायद्यापेक्षा कमी असेल
केलेची म्हणजे 'must / should / could'?
आता मला पटतंय कि केलेची म्हणजे 'must'. ह्या निबंधातून मला स्वात:ला प्रेरणादायी वाटतंय. केलेची पाहिजे. कारण गोष्ट पूर्ण झाल्या नंतर चा आनंद! हा हा हा! काम करून मग बसणं के काम असताना बसण्यापेक्षा नक्की वेगळ आहे. तो जो काही आनंद आहे, ते मिळवण्यासाठी मी म्हणेन कि केलेची म्हणजे 'must'
पाहिजे कोणाला? __ हा भाग मी तुमच्या साठी ठेवत्ये.
:)