पहिली माझी ओवी ग गावाच्या मातीला
सुगंधान पाहिलं नहाण पोरीच्या जातीला
दुसरी आली ओवी माझी आईसाठी मनात
हसता हसता राब राबुनि हसु ठेविले ओठात
पुढची बाई ओवी ग उन्हं रांगती अंगणी
मायेच्या किरणान उदंड दिलंय आजीनी
चवथी माझी ओवी ग विमानाची ऊडी ती
बहीण-बाई तुझी गाणी आली माझ्या संगति
पाचवी माझी ओवी ग मैत्रि माझी गुणाची
अंतराला कापुन जिने गाठ बांधली खुणेची
सहावी माझी ओवी ग शाळेसाठी गाऊ द्या
लिहिती झाले जिथे आता सुट्टीनंतर जाऊ द्या
सातवी माझी ओवी ग शेजारणिची आई ग
घरासारख घर जिने रहायाला दिलं ग
आठवी माझी ओवी ग अनोळखी बायांना
घरोघरी आनंदानी जपती ज्या घरांना
नववी माझी ओवी हा दिवा ठेवते शब्दांचा
बाई-च्या जळण्याला "तेवण" म्हणते शुचिता
नाही कोणी मोठा किंवा नाही कोणी लहान
जाण ठेवुनी जन्म जाऊदे हेच एक मागणं
- स्त्री-दिनाच्या शुभेच्छा -
सुगंधान पाहिलं नहाण पोरीच्या जातीला
दुसरी आली ओवी माझी आईसाठी मनात
हसता हसता राब राबुनि हसु ठेविले ओठात
पुढची बाई ओवी ग उन्हं रांगती अंगणी
मायेच्या किरणान उदंड दिलंय आजीनी
चवथी माझी ओवी ग विमानाची ऊडी ती
बहीण-बाई तुझी गाणी आली माझ्या संगति
पाचवी माझी ओवी ग मैत्रि माझी गुणाची
अंतराला कापुन जिने गाठ बांधली खुणेची
सहावी माझी ओवी ग शाळेसाठी गाऊ द्या
लिहिती झाले जिथे आता सुट्टीनंतर जाऊ द्या
सातवी माझी ओवी ग शेजारणिची आई ग
घरासारख घर जिने रहायाला दिलं ग
आठवी माझी ओवी ग अनोळखी बायांना
घरोघरी आनंदानी जपती ज्या घरांना
नववी माझी ओवी हा दिवा ठेवते शब्दांचा
बाई-च्या जळण्याला "तेवण" म्हणते शुचिता
नाही कोणी मोठा किंवा नाही कोणी लहान
जाण ठेवुनी जन्म जाऊदे हेच एक मागणं
- स्त्री-दिनाच्या शुभेच्छा -
No comments:
Post a Comment