शब्दांच्या सार्या लाटांवरी
अबोल धारा शांत सरी
वेचीत वाळूत शंख शिंपले उडेल वाटे वारा शुभ्र
अंग उन्हाने आत पाहावे अश्या नितळ या दिशा निरभ्र
फुलत रंगात रंगीत रंगत, बहरू पाहे गंध जरी
कानोकानी, रानोरानी, गर्जे वाणी प्रहरी प्रहरी
निरभ्र आभाळ, ओमकार गर्जत, झरझर झरा ताल धरी
टपटप मेति गाणी गाती, बहरून आल्या लहरी लहरी
घंटानादे नाद कोंडला, मृदुंग वेणा मग्न हरी रोमरोमी,
रामी विश्रामी, कुठले शब्द, कसली वाणी
शब्दांच्या सार्या लाटांवरी अबोल धारा शांत सरी
शुचिता

No comments:
Post a Comment