Wednesday, January 12, 2022

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे

चालढकल' हा ज्यांच्या आयुष्याचा भाग आहे, त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काय माहित्ये हे सांगण्यापासून जर सुरवात केली तर अखंड पाने भरली जातील. 

आपल्याला हे खूप उत्तम रीतीने माहित्ये कि - 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे'. पाचशे वर्षांपूर्वी समर्थानी सांगितलेलं हे वाक्य, काळाच्या सर्व परीक्षा पार करून आज देखील मार्गदर्शन करतंय.  इतिहास बाजूला ठेऊन जरी आज अवतीभाती पहिल, तर आपल्याला भांडवलशाहीच उत्तमोत्तम उदाहरण असलेल 'नाईकी' सर्व ठिकाणी नक्की बघायला मिळेल. पूर्व असो किंवा पश्चीम. "Nike - Just Do It". अब्जाचा व्यापार या वाक्यामुळे होतो आणि होत राहील. थोडक्यात म्हणजे अनेक निबंधांचे जे प्रमूख कार्य असतं 'proving the point' ते कार्य पूर्ण. केवळ उच्चारातून अर्थापर्यंतचा विचाराचा प्रवास लगेच पूर्ण होतो कारण हे खरं आहे. 


मी जरा खोलात जाऊन लिहिणार आहे. 

  • केल्याने काय होत आहे? 

  • रे म्हणजे मीच का? 

  • आधी म्हणजे नक्की कधी? 

  • केलेची म्हणजे 'must / should / could'? 

  • पाहिजे कोणाला?


केल्याने काय होत आहे? 


ज्योती ना., माझी खूप हुशार आणि व्यवहारी मैत्रीण. तिने मला एकदा खूप उत्तम सल्ला दिला "शुचिता, जो काही निर्णय आपण घेतो, तो एकदा तरी खूप छान result देतो, आणि किमान एकदा तरी खूप भयंकर result. निर्णय ना घेणं हा देखील एक निर्णय-च आहे" त्या नंतर आम्हाला कळलं कि भयंकर म्हणजे खूप वाईट नाहि, आणि छान म्हणजे देखील खूप छान नाही. टोकाचं असं आयुष्यात काही generally नसतं. आज मला असं वाटतंय कि "केल्याने काय होत आहे?" यातिल पहिला अडथळा विचारांत आहे. 'paralysis by analysis' हे आपल्या सगळ्यानी अनुभवलय. एखादी गोष्ट करावी असा विचार आल्यानंतर ते कशी नंतर करावी हा विचार लगेच येतो. मग आपण सवय बदलू शकतो का? नक्की. कोविड काळात मला हे कळतंय कि सवयी बदलायच्या असतील तर त्या नवीन सवयीनं replace करायला हवं म्हणजे हवं. नाही तर जुनी सवय डोकावते. 'चालढकल' का बरं आपल्याला वर्ज्य नाही करता येणार? try करायला काय हरकत आहे?



रे म्हणजे मीच का? 


रे म्हंजे मीच. कारण स्वत: न करता, दुसऱ्याला सल्ला देणं योग्य नाही. 



आधी म्हणजे नक्की कधी? 


"The 5 Second Rule" by Mel Robbins. मी TED _Talk मध्ये ऐकून होते कि जर आपण ५ क्षणात कार्यरत झालो नाही तर आपला मेंदू टी गोष्ट रद्द करतो.  जे गोष्ट आपल्याला करायची असते, त्याचा विचार येत राहतो. कार्यरत ना झाल्या मुले विचार मरत राहतो. मग खूप काळ टी गोष्ट केली नाही तर stress कारण मेंदूला माहित्ये कि करायला तर हवंय. जर मी म्हंटलं कि आपण जेवढा वेळ विचार करतो तेवढा वेळ कृती करण्यात घालवला तर खूप गोष्टी घडून येतील - तर तुम्ही सहमत असाल का? एक अजून भाग बघूया - लगेच गोष्टी करणं म्हणजे धांदरट असणं किंवा उथळ असणं आहे का? कदाचित असू शकेलं. पण आपण हुशार आहोत. पहिल्यांदा घाई घाई मध्ये 'आधी' या शब्द कदाचित आपलयाला त्रास देईल देखील. पण, अनुभवातून आपण नक्की बॅलन्स सांभाळायला शिकू. आधी केल्या मुले होणारा त्रास नक्कीच फायद्यापेक्षा कमी असेल 



केलेची म्हणजे 'must / should / could'?


आता मला पटतंय कि केलेची म्हणजे 'must'. ह्या निबंधातून मला स्वात:ला प्रेरणादायी वाटतंय. केलेची पाहिजे. कारण गोष्ट पूर्ण झाल्या नंतर चा आनंद! हा हा हा! काम करून मग बसणं के काम असताना बसण्यापेक्षा नक्की वेगळ आहे. तो जो काही आनंद आहे, ते मिळवण्यासाठी मी म्हणेन कि केलेची म्हणजे 'must'



पाहिजे कोणाला? __ हा भाग मी तुमच्या साठी ठेवत्ये. 

:)

Sunday, January 31, 2016

Letting Go करून बघ

माया बघ दाखवते तुला
क्षणोक्षणी मजा कशी?
जुनी आठवण ओली
काल जणू घडली जशी

जेव्हा घडलं सार तेव्हा
सहन केलं सार आपण
आता का जपतोय डोक्यात
नाट्यमय ती आठवण

SHUCHITA UKIDAVE _ FLOATING























माया नावाचा magic show
बघ कसा असतो तो

जुनी स्वप्नं अधुरी
कदाचित नाही झाली पूरी

जुना राग रुसवा काढायचा
विचार देखील कुणी नाही केला

जुना बहाणा / कारण / उपाय / सुझाव
खेळाखेळात कालबाह्य झाला

कदाचित मी बरोबर सांगत होते
कदाचित ती बरोबर सांगत होती
कदाचित त्याचं बरोबरच असावं
कदाचित त्या सगळ्यांच चुकलं असावं

हे सारे
नाही खरे
आज नव्हे अत्ता
ह्यावरच आपली सत्ता
भूत आणि भविष्यात
मायेचाच राबता

काळाची फुंकर
वेळेची झुळूक
जीवनाचा पाऊस
मृत्युचं धुकं
एकदा येउन गेलं, झालं मग
Letting Go करून बघ


तसंही आधीच तू सहन करून झालंय
मग परत आठवणीत कशाला
परत परत सहन करतेस
जुने त्रास, जुना राग, जुने अन्याय
एकदा सहन केलं, झालं मग
Letting Go करून बघ


म्हणा बाकी सारे बदललय
तळ्याच पाणी वाफ होऊन
परत आलंय
लाटा कशाला जुन्या मानायच्या?
एकदा भिजून झालं, मिळालं मग
Letting Go करून बघ



आज का घडून गेलेल्याची रग?
विद्या-अविद्याचा फरक बघ 

तुझी 'आशा' नावाची एक धग
जुन जाळेल लगोलग

बघ, समजून  बघ, करून  बघ
सोडून  बघ
Letting Go करून बघ


शुचिता

Monday, March 16, 2015

Runanubandhachya - Pandit Kumar Gandharva

This Marathi song is one of the timeless romantic songs. 
- Simple yet complex.
- Spiritual yet lively like everyday life
- Structured in Pandit Kumar Gandharva's classical nature yet flowing like a free waterfall
This song takes me in a different mindscape every time I hear. 

Panditaji is known for the formless (nirguna) devotional (bhajan). But do you also feel that the boundary between the love for beloved and Beloved appear to fade in this song. A step further, he and his beloved both are completely surrendered in that Nirguna - and they sing together with utter love for each other.

I hope you enjoy this!



from Ukidave.Shuchita's youtube channel.




ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी

भेटीत तुष्टता मोठी



त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी

त्या तिनिसांजा त्या आठवणी त्या प्रहरी

कितिदा आलो, गेलो, जमलो

रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी



कधि तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगीच ते हसणे

म्हणून ते मनोहर रुसणे

हसणे, रुसणे, रुसणे, हसणे

हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिंच्या गाठी



कधि जवळ सुखाने बसलो

दुःखात सुखाला हसलो

कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो

सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा

जल्मासाठी जल्म जल्मलो, जल्मात जमली ना गट्टी





गीत - बाळ कोल्हटकर

संगीत - वसंत देसाई

स्वर - पं. कुमार गंधर्व ,  वाणी जयराम

नाटक - देव दीनाघरी धावला

राग - पहाडी





****










Saturday, March 14, 2015

सरी शब्दांच्या

शब्दांच्या सार्या लाटांवरी 
अबोल धारा शांत सरी 

वेचीत वाळूत शंख शिंपले उडेल वाटे वारा शुभ्र 
अंग उन्हाने आत पाहावे अश्या नितळ  या दिशा निरभ्र 

फुलत रंगात रंगीत रंगत, बहरू पाहे गंध जरी
कानोकानी, रानोरानी, गर्जे वाणी प्रहरी प्रहरी 

निरभ्र आभाळ, ओमकार गर्जत, झरझर झरा ताल धरी 
टपटप मेति गाणी गाती, बहरून आल्या लहरी लहरी 

घंटानादे नाद कोंडला, मृदुंग वेणा मग्न हरी रोमरोमी,
रामी विश्रामी, कुठले शब्द, कसली वाणी 

शब्दांच्या सार्या लाटांवरी अबोल धारा शांत सरी 

शुचिता 

Friday, March 13, 2015

प्रवास

एका पिवळ्या जंगलात
एक वाट दोन दिशांना जाऊ पाहते
पण मी  मात्र केवळ
एकच मार्ग चालू शकते

आभाळ थोड जास्त निळ
खोली रानाची जणू जास्तच खोल
कोणती निवडावी वाट आज
उद्याची किंमत आजचं मोल

एक झुळूक आली घेऊन रानाचे
सुगंध रानाच्या मातीची लाली
वाटेवरची उडाली पाने
सळसळीतुन एक जाग आली

एका दिशेने दूरवर, उतरणीवरून
उतरत, आभाळ दिसतंय स्वच्छ ठळक
पण दिखावा आभाळाचा दाखवत्ये दरी
का कापर खोलवर, नव्हतं कळत

दुसर्या दिशेने जवळूनच, ती वाट
वळत्ये लगेच, घनदाट रानच रान
नाही आडोसा, नाहीच कि उघड किरणांची
रान खर्या अर्थानी वाढलंय छान

मन्द वारा, भर दुपार, सोनेरी झाडं
आणि कवडसे सोनेरी, सोनेरीच गवत
सारं रसरशीत, सारं सच्च्य, मी देखील
पाय उचलला, रानाची सोबत

तो एक दिवस होतां
ती एक द्विधा होती
आज पहात्ये वळून मागे
सोनसळ भरल्या रानाची

- शुचिता
SOURCE: http://bigbackground.com/fall/fall-backgrounds.html
सोनेरी प्रवास 










Sunday, March 8, 2015

मार्लीश उखाणे

heated-seats आणि हातात हात
- - - - - चा सहवास म्हणजे awesome थाट 
- - - - - च्या बरोबर - - - - - असली की
येऊ द्या कि थंडीची लाट



हिंदी सिनेमा पाहायला गेलो BRAMPTONला परवा
- - - - - मस्त आणि मी हि झकास, तुम्हीच काय ते ठरवा



पहिली स्यान्टा फे,  दुसरी बिमर, तिसरी फरारी
- - - - - लाजते तेव्हा दिसते लई भारी




आमच्या कार मध्ये माझा जानूच भरतो ग्यास
- - - - - च नाव घेते eagerly भरवून घास 



मेपलची पाने उडतात वार्यावर लाल लाल
- - - - - च्या बरोबर - - - - - करते धमाल 



इंडियाला जाऊ तेव्हा करतो मनोभावे पूजा
- - - - -  चे नाव घेऊन घेते मी रजा.



Rockies पर्वतावरा बर्फाच्या राशी,
- - - - -  चे नाव घेते - - - - -  च्या दिवशी



Dining Table वर काटा आणि चमचा 
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा




आवडतं आमचं RESTAURANT - CHIPOTLE
- - - - - च्या प्रेमात - - - - - चे पूर लोटले




अमेरिकेच्या FLAG वर STARS आहेत फिफ्टी
- - - - - म्हणतो मला स्वीट्टी



 Visit blogadda.com to discover Indian blogs

Saturday, March 7, 2015

ओवी - स्त्री-दिनाच्या शुभेच्छा

पहिली माझी ओवी ग गावाच्या मातीला
सुगंधान पाहिलं नहाण पोरीच्या जातीला

दुसरी आली ओवी माझी आईसाठी मनात
हसता हसता राब राबुनि हसु ठेविले ओठात

पुढची बाई ओवी ग उन्हं रांगती अंगणी
मायेच्या किरणान उदंड दिलंय आजीनी

चवथी माझी ओवी ग विमानाची ऊडी ती
बहीण-बाई तुझी गाणी आली माझ्या संगति

पाचवी माझी ओवी ग मैत्रि माझी गुणाची
अंतराला कापुन जिने गाठ बांधली खुणेची

सहावी माझी ओवी ग शाळेसाठी गाऊ द्या
लिहिती झाले जिथे आता सुट्टीनंतर जाऊ द्या

सातवी माझी ओवी ग शेजारणिची आई ग
घरासारख घर जिने रहायाला दिलं ग

आठवी माझी ओवी ग अनोळखी बायांना
घरोघरी आनंदानी जपती ज्या घरांना

नववी माझी ओवी हा दिवा ठेवते शब्दांचा
बाई-च्या जळण्याला "तेवण" म्हणते शुचिता

नाही कोणी मोठा किंवा नाही कोणी लहान
जाण ठेवुनी जन्म जाऊदे हेच एक मागणं

- स्त्री-दिनाच्या शुभेच्छा -





Visit blogadda.com to discover Indian blogs

हर्ष खेद ते मावळले - कवी - केशवसूत

आपण दूर राहातो पण एकत्र असतो, शब्द ऐकतो पण मन मोडतो, भक्ती आणि श्रद्धा यातले फरक तोलतो आणि जोडतो देखिल. रोजच्या सच्च्या आणि रसरशीत जीवनात आपण कोरडे का होतो बर? कदाचित आपल्या जाणीवा कामात इतक्या गुंतून गेल्या असतात कि काही सांगावंसं वाटाण राहून जातं. 

कामात गुंताण्यातला आनंद, संवेदना खोलवर जाण्यातला आनंद, झपूर्झा लागण, खोलवर बुडण्यातला आनंद, काही नसण्यमधला देखील आनंद आणि असण्यमधला देखील! 

किती तरी कविता आपल्या संवेदनशील मनाला आपल्या भाषेचा सुगंध त्यातल्या शब्दामधून दूर दूर वर पोहोचवतात.
अशी एक कविता जरी जगातली सुखदुख्ख बदलली असली तरीही चिरकाळ वाटते, म्हणून लिहिली 

हर्ष खेद ते मावळले,
हास्य निमाले / अश्रु पळाले;
कण्टकशल्ये बोथटली / मखमालीची लव वठली;
काही न दिसे दृष्टीला 
प्रकाश गेला / तिमिर हरपला;
काय म्हणावे या स्थितिला?
झपूर्झा! गडे झपूर्झा !
कवी - केशवसूत 

SHUCHITA MARATHI POEM
काय म्हणावे या स्थितिला / SHUCHITA UKIDAVE

Tuesday, December 18, 2007

गार गार थन्डी

सोसेना थन्डी मला सोसेना थन्डी
गार गार बोचSरी सोसेना थन्डी

वार्यावाणी बरफ भुरु भुरु येतो
राघू अन मैनेच घर गोठवतो
गोठलेले दिस - ऊबदार राती
इथे बाई बोचSरी सोसेना थन्डी
सोसेना थन्डी हिला सोसेना थन्डी

खावू नि पिवू, टशनेने राहू
सिनेमाच्या सिडी हो पुनापुना पाहू
अभिशेकची ऐशु, वाडीयाची प्रिती
इथे बाई बोचSरी सोसेना थन्डी
सोसेना थन्डी हिला सोसेना थन्डी

सुरव्या आताश्या नाई उगवत
बोभाटा झालाय लई गावकीत
दिस झाले छोटे, लाम्बलाम्ब राती
इथे बाई बोचSरी सोसेना थन्डी
सोसेना थन्डी हिला सोसेना थन्डी

या थन्डीच्या दिसात थोड माझ ऐका,
बघायच सोडा आणि सोड्याच बघा,
लाल-लाल, सोनेरी लोक काही पिती
इथे बाई बोचSरी सोसेना थन्डी
सोसेना थन्डी हिला सोसेना थन्डी

ही थन्डी बी जाईल, उघाडून येईल
तग धरा राया, तुमा मजा येईल
मोकळ्या ढाकळ्या घुमतील पोरी
इथे बाई बोचSरी सोसेना थन्डी
सोसेना थन्डी हिला सोसेना थन्डी

Sunday, December 16, 2007

विश्राम जिवाला नाही...

नाती-गोती-माती
सोडून मान्डला डाव
सजवले मुखवटे सारे
विश्राम जिवाला नाही...

जगण्याची जिद्द जिवाची
मनास हरवून गेली
जिन्कले विश्व बळाने
विश्राम जिवाला नाही...

घाव खोलवर झाला
शद्बान्ची धार जिव्हारी
बम्बाळ जाहल्या ज्वाळा
विश्राम जिवाला नाही...

सरता वेस घराची
भूतेच भवती सारी
सावरला तोल तरीही
विश्राम जिवाला नाही...

लोभ जगाचे खोटे
व्यापार शिवाचा येथे
शुचिता जपली अन्गी
विश्राम जिवाला नाही...

आज पुन्हा सान्जेला
आशारामी आई
निजव गाऊनी गीत
विश्राम जिवाला नाही...

Wednesday, December 5, 2007

झोळी तिची!

झोळी तिची!
तू ही तर तिचाच ना
कितिही भरलास तरी
तिच्या वाचुन रिताच ना

झोळी तिची!
करावी रिकामी तीनेच
भरुन आलेल सान्डाव
बहरात प्राजक्तानेच

झोळी तिची!
ताम्बड फुटतानाचि लाली
भरुन आलेला गारवा
सम्पुन उरलेलि निळाई

झोळी तिची!
झुन्ज़ु मुन्जु आभाळ
जड जड झापडे
एक नाते - नाSते
जे नसतेच ते

पण. .

मन - मन काय भटकणारच
तन - तन काय हरपणारच
- धनाची तर तर्‍हाच नवी
जगण्याला माझ्या ह्या
केवळ तुझीच दिशा हवी
पण. .
ईछ्चाना माझ्या
बाहेर मुळी यायचच नाही ये
येणार असशील. . .
तर तूच ये

एखद्याच

केवळ तीर्व भावना
करतात शब्दाच गाण
श्वास तर सग्ळेच घेतात
एखद्याचच असत जीण

आठवण

आठवणीच्या धुक्यात
स्वैर हरवून जाणार
पुन्हा पुन्हा तेच स्वर
पण गीत वेगळ गाणार

आठवणीतली ती
तिच्या आठवणीतला तो
आठवण तीच
पण डोळे बदललेले

कधी कधी

कधी कधी पडु देत थेम्ब
भरुन गोठलेल्या डोहातले
बर्फ़ाखालच पाणी अजूनहि प्रवाही आहे
कळेल मला हि

-शुचिता-

भास-आभास

रोजच सूर्य उगवतो पण कुठे विश्वास आहे की रोजच तो दिसेल? चन्द्र मात्र कधी वाढतो-कधी कमी होतो; पण तरी आमावस्येला देख़ील मला खात्री असते की तो आभाळात आहेच... असेच अनेक भास-आभास आता अन्गवळणी पडल्येत...

डोळे मिटताच अन्धाराला उजेडाची आस आहे
दिसतोय तो चेहरा नाही चेहर्याचा भास आहे

बर्फ़ाखलि खोलवर जीवन धरुन कास आहे
वरवरचा सून्दर बर्फ़, तरन्गण्याचा त्रास आहे
सुकून गेलेल्य बकुळीचा पानापानात वास आहे
धूरासारखा दिस्ला तरी हा माझाच श्वास आहे

चमकणार्या थेम्बा-थेम्बात कवडश्याची मीजास आहे
लोलकात परसदानी इन्द्रधनुचा उल्हास आहे
पान्ढर्या रन्गात गोठलेला रन्गान्चा प्रवास आहे
पण अन्धारलेली एक वाट जिथे सावलीचा निवास आहे

ऊन्ची गाठून ढगामागे पक्षाला प्रवास आहे
ताल-बध्द उडत्या रान्गा, अबोल विश्वास आहे
घारीच्य झेपेमागे पिलाचा ध्यास आहे
शब्द रन्गेल, लय रन्गीन, पण सूर का उदास आहे

डोळे मिटताच अन्धाराला उजेडाची आस आहे
दिसतोय तो चेहरा नाही चेहर्याचा भास आहे

शुचिता

श्रावणात

श्रावणात अन्गणात, ऊन पावसाची खेळी
पानाफुलान्ची आरास, गुलबाक्षी सायन्काळी

खळखळा वाहे पाणी, पाचूजैसी सजली धरणी
ऐकु येती रानीवनी, श्रावणाची मन्जुळ गाणी

ओलसर ती पागोळी, आवाराला जागे ठेवी
धुरामधी कौल ओली, सारवली ओटी पडवी

दर्यावरी शिडे चढती, मौज नारळी पौर्णिमा
भावासाठी गोडधोड, आई-सवे माझा मामा

निळसर डोहाकाठी, कमी होते का ग वय
आट्यापटीच्या खापरी, उगी देती मज सय

कष्टाळू या कोकणात, पायाखाली लाल माती
कणखर जाम्भ्यामधे कशी आसवे कोन्दती

शुचिता

सोबत

सह्याद्रीच्या कडेकपारीतून घोन्गावणारा वारा, सुगरणीचे घरटे, तुळशी समोर तेवणारा नीरामय दिवा, गुढिमधल्या कदाची घट्ट वीण, मरुतीवरचा तेलकट शेन्दूर....

सर्वच गोष्टीन्चे आभार मानायला हवेत मला; कारण याच सर्व गोष्टीमधून कळले की "सोबत" काय असते....

केवढी सोबत, वाहून ओसन्डून गेलेल्या पागोळीची
वाट बघणार्या आईच्या न लवण्यार्या पापण्यान्ची

केवढी सोबत, उजाडल तरी तेवत राहिलेल्या वातीची
ढगमागे दडलेल्या सूर्याच्या कन्जूष उष्णतेची

केवढी सोबत, तान्द्ळावर तेवत राहिल्या पणतीची
काळामागे पसर्लेल्या अनन्त तेजाची

केवढी सोबत, मिट्ल्या डोळी दिसणार्या स्वप्नान्ची
धावताना थकूनही परत धावणार्या पावलान्ची

केवढी सोबत, स्वत:च्या लयबध्द श्वासान्ची
"जगणारा" आणि "जीवन्त" शब्दातल्या फरकाची

सोबत - केवळ साथ आहे, हातामधे हात आहे
सोबत - केवळ कारण आहे, दुसर्यासाठी प्राण आहे
सोबत - केवळ निम्मित्त, पुढे जाण क्रमप्राप्त
सोबत - केवळ सोबत, भिरु मन कमकुवत
सोबत एक अचल, निर्भय प्रीत आहे,
जगणार्याने जगताना म्हणायच गीत आहे,

सोबत एक जनरीत आहे,
हीच ती जनरीत आहे

शुचिता

हरीमय

हरी चालक मालक
रोजी रोटी त्याच्या दारी
सेवा त्याची करोनिया
मग भर रे तिजोरी

बाळ फिरे देशोदेशी
वार्यासन्गे जैसा गन्ध
कस्तूरीच्या शोधासाठी
म्रुगासन्गे नको बन्ध

चुका जश्या कळु येती
भर भरतो हुन्कार
सावळ्यच्या नाममात्रे
वेलीपानाना आधार

मधुरशी वेळु-धून
हरी गाई उषागत
पहाटेला बन्द डोळी
दिसे कोणी निळसर

काही फुले गळु आली
काही वेलीना बहर
हरी भोळा त्रुप्त पाही
दोन्ही सुगन्धी सुन्दर

हरीसाठी, हरीमय
हरी मन हरी तन
दे रे माझ्या नारायणा
डोळाभरून दर्शन

शुचिता

दिवा अन्तर्मनीचा

तळहाताच्या रेषान्मधल्या,
गर्दीमधुनी काढुन वाट
काळ सान्गतो निरोप हरीचा
'नित्य घडीचा - नित्य प्रवास'

अन्तर्मनीचा दिवा जागता,
पेट घेऊनि जळती ताप
लख्ख झळकल्या दाही दिशा या,
मिणमिणलेली विझवून वात

ओढून घेई नीरव खोली,
निळ्या कणान्चा पूर जिथे
तरन्गुनी मन नाचत गाते,
ना छाया ना ऊन तिथे

अनोळखी हे द्रुश्य तरिही,
लोभ जिवाला पुन:पुन्हा
सन्ग तुझा रे सख्या सावळ्या,
हवा निरन्तर मुग्ध मला

तारुन झुलती जीवन नौका,
तुच नेई बा पैलतीरा
चुका अनन्वित घालुन पोटी,
मार्ग दाखवा दयाघना

भुजन्ग मनिचा जागा होता,
दोले सहजी सळसळ साप
बरबटलेली त्वचा सान्गते,
येवो शुचिता टाकुन कात

शुचिता

सान्जवेळी रातराणी मोहरावी

सान्जवेळी रातराणी मोहरावी
मोहरोनी देहदेठी ती फुलावी

गात्र गन्धवून सान्जवेळी
रात्र पान्घरून सोनसळी
या नभाने आर्त हाक हाकारावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी

दीप लखाखत सान्जवेळी
काळ जळू देई ही काजळी
नारायणी जन्मखूण सापडावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी

चन्द्र चान्दण्यात चूर व्हावा
चिम्ब तलावात वितळावा
शहारती चन्द्रवेडी ती लव्हाळी
सान्जवेळी रातराणी मोहरावी

सूर दूरूनिया येती कानी
घुमे दाहीदिशात विराणी
भैरवी तू अखेरची आळवावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी

शुचिता