सान्जवेळी रातराणी मोहरावी
मोहरोनी देहदेठी ती फुलावी
गात्र गन्धवून सान्जवेळी
रात्र पान्घरून सोनसळी
या नभाने आर्त हाक हाकारावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी
दीप लखाखत सान्जवेळी
काळ जळू देई ही काजळी
नारायणी जन्मखूण सापडावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी
चन्द्र चान्दण्यात चूर व्हावा
चिम्ब तलावात वितळावा
शहारती चन्द्रवेडी ती लव्हाळी
सान्जवेळी रातराणी मोहरावी
सूर दूरूनिया येती कानी
घुमे दाहीदिशात विराणी
भैरवी तू अखेरची आळवावी
सान्जवेळी रातराणी मोहरावी
शुचिता
2 comments:
खरच.. मनातिल भाव शब्दांत व्यक्त करणे जरा अवघडच्...ब-याच ओळींमध्ये आठवणींचा स्पर्श आहे ...शब्दांचि अचुक placement .. भाषासौंद्र्य आणी रचना उत्तम.. कवयित्रींनी वाचकांना मेजवानी दिली हे काही सांगायचि आवश्यक्ता भासत नाहिये .. great work ... .. u shd keep doing such great creativity .. n keep making us to utter such words.. keep rocking .. YOGI
Yogi,
thanks for thoes encoraging words; yes bloging is about sharing the of joy, sharing of creativity and sharing of a collective sensitivity
thanks once agian
Post a Comment