नाती-गोती-माती
सोडून मान्डला डाव
सजवले मुखवटे सारे
विश्राम जिवाला नाही...
जगण्याची जिद्द जिवाची
मनास हरवून गेली
जिन्कले विश्व बळाने
विश्राम जिवाला नाही...
घाव खोलवर झाला
शद्बान्ची धार जिव्हारी
बम्बाळ जाहल्या ज्वाळा
विश्राम जिवाला नाही...
सरता वेस घराची
भूतेच भवती सारी
सावरला तोल तरीही
विश्राम जिवाला नाही...
लोभ जगाचे खोटे
व्यापार शिवाचा येथे
शुचिता जपली अन्गी
विश्राम जिवाला नाही...
आज पुन्हा सान्जेला
आशारामी आई
निजव गाऊनी गीत
विश्राम जिवाला नाही...
5 comments:
"विश्राम जिवाला नाही..."
i read a blog sanvaad; and there was a "chalolii" which ended as "विश्राम जिवाला नाही..."
the line i felt was extremely poking, raising inquiries, worring, and iterative
want to thank yashodhara
http://sanvaad.blogspot.com/
सुरेख! अत्यंत सुरेख!!
माझ्या ब्लॉगवर अभिप्राय दिल्याबद्दलही धन्यवाद :)
surekh!
विश्राम जिवाला नाही...
This is so true, just can't get enough of anything and hence,
विश्राम जिवाला नाही...
विश्राम जिवाला नाही हे खरंय, तरुण अन् म्हातारे दोघांनाही . इतका व्याप वाढवून ठेवलाय सा-यांनीच.
Post a Comment